बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हातात बंदुका घेऊन इलेक्ट्रिक कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडीओ व्हायरल

काबुल | तालिबान या एकाच शब्दात आता अफगाणिस्तानच्या नागरिकांचं आयुष्य सामावलं आहे. शाळा, महाविद्यालय, संसद, उद्यानं जिकडे पहावं तिकडे तालिबानी दिसत आहेत. जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं, या सर्वांच्या मनामध्ये आज आपण जिवंत राहु का हा विचार घर करून बसला आहे. अफगाणिस्तानने आपलं स्वातंत्र्य गमावलं आहे. काबुल या त्यांच्या राजधानीवर आता दहशतवादी राज्य करणार आहेत.

मोठ्या प्रमाणात तालिबानी दहशतवाद्यांचे विचित्र पद्धतीने वागतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ससंदेच्या सभागृहात त्यांचा वावर असेल किंवा राष्ट्रपती भवनामध्ये त्यांच्या वागण्याचा विचित्रपणा असेल हे त्यांच्या अल्पबुद्धीची लक्षणच आहेत. सामान्य नागरिक हे त्यांच्या या विचित्र वागण्याला आपलं फुटकं नशिब समजत आहेत. अफगाणिस्तानवर आता या जोकर सारख्या वागणाऱ्या दहशतवाद्यांच राज्य आहे.

बाॅलिवूडचे प्रसिद्ध दिग्ददर्शक राम गोपाल वर्मा यांनी या दहशतवाद्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे दहशतवादी हातात बंदुका घेऊन लहान मुलांसारखं खेळत आहेत. कधी ते कार चालवातात तर कधी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत लहान मुलांसारखं नाचतात.

लाखो निरपराध लोकांचं आयुष्य खराब करून तालिबानी अगदी आनंदाने नाचत आहेत. फक्त देशाभिमान नसलेले लोक सत्तेत बसले म्हणून अफगाणिस्तानच्या नागरिकांना हे वाईट दिवस पहावे लागत आहेत. राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना  शेवटी सर्व सत्य… तालिबानी फक्त बच्चे आहेत… असं लिहिलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या 

विवाहित महिला आणि अविवाहित पुरूषांमधील लिव्ह इन संबंध अवैध- उच्च न्यायालय

“आपला देशच भारीये, आपलं नशीब आहे की आपण भारतात राहतो”

“अफगाणीच लढायला तयार नाहीत मग आम्ही आमच्या सैनिकांचे प्राण संकटात का टाकू?”

“राज्यपाल महोदय आठवा महिना लागला, निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार?”

अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांबाबत मोदी सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More