बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तालिबानी आम्हाला काश्मीर प्रश्नावर मदत करणार आहेत”

इस्लामाबाद | तालिबानने अफगाणिस्तानमधील एकेक भागावर ताबा घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाठिंबा मिळवण्यासाठी तालिबान प्रयत्न करत आहे. अशातच पाकिस्तानमधील पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षातील एका नेत्यानं काश्मीरसाठी तालिबान मदत करणार असल्याचा दावा केला आहे.

आम्ही तुमच्यासोबत आहोत, तसेच काश्मीर प्रश्नांबाबतही आम्ही मदत करू असं तालिबाननं आम्हाला सांगितलं आहे, असं टीव्हीवरील एका लाईव्ह कार्यक्रमावेळी पीटीआयच्या महिला नेत्या निलम इरशाद शेख यांनी म्हटलं होतं. अफगाणिस्तान वाल्यांनी तालिबान्यांना चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली आहे त्यामुळे तालिबान आम्हाला मदत करेल, अशीही आशा निलम शेख यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर इम्रान खान यांनाही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गुलामगिरीच्या जाचातून तालिबानची सुटका झाली आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करतो तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो, संस्कृतीतून बाहेर येणं सोपं नसतं. अफगाणिस्तानात जे काही होत आहे, ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्यासारखं आहे, असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य प्रस्थापित झाल्यानंतर भारतासह, अमेरिका, ब्रिटन, उत्तर कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांनी तेथील दुतावास कार्यालय बंद केली आहेत. आता हे दे़श अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनेचे मर्द नाही बंद कार्यालयावर हल्ला म्हणजे गांडूपणा”

तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण सरकार देश विकण्यात व्यस्त आहेत- राहुल गांधी

“मी जर गॅंगस्टर होतो तर शिवसेनेने मला मुख्यमंत्री का केलं होतं”

‘काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा…’; मुख्यमंत्र्यांची नाव न घेता राणेंवर टीका

काय सांगता! पुणे मेट्रोतून चक्क सायकल घेऊन प्रवास करण्याची मुभा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More