बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तालिबान्यांचं सरकार फक्त सहा महिने टिकणार त्यानंतर….’; अफगाणिस्तानमधील मोठी माहिती समोर!

काबूल | अफगाणिस्तानमधील बऱ्याच मोठ्या घडामोडीनंतर आता तालिबानने आपल्या नव्या सरकारची घोषणा केली आहे. तालिबानी नेता आणि पंतप्रधानपदी निवड झालेला मुल्ला मोहम्मद हसन अखुंड यांच्या मंत्रिमंडळात एकुण 36 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.  मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दूस सलाम या तालिबान नेत्यांकडे उपपंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परंतु या मंत्रिमंडाळाबाबत अजून नवीन माहिती समोर येत आहे.

तालिबानने काळजीवाहू सरकारची घोषणा केली आहे. ते सरकार फक्त 6 महिने सत्तेत असणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेऊन नवीन सरकार स्थापन केलं जाणार आहे. त्याचबरोबर मतदानाच्या आधारावर नवीन नेत्यांना मंत्रिमंडळात देखील स्थान देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तालिबानने जाहीर केलेल्या काळजीवाहू सरकारमध्ये पश्तून समाजाचा सर्वात जास्त सहभाग आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागातून लोकांनी या सरकारला मान्यता देऊ नये, अशी मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे.

दरम्यान, नव्या सरकारमध्ये महिलांनाही मंत्रिमंडळात सामील करण्याचं आश्वासन तालिबानने दिलं होतं. परंतु ज्यावेळी नवीन सरकारची घोषणा केली तेव्हा मंत्रिमंडळात महिलांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे मंगळवारी महिलांनी अफगाणिस्तानच्या दुतावासासमोर महिलांनी आंदोलन केलं. त्यावेळी हजारो महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

थोडक्यात बातम्या-   

सुपर लेडी! तालिबानच्या बंदूकधारी दहशतवाद्यासमोर ‘ती’ निडरपणे राहिली उभी

‘तुमचा भुजबळ करू म्हणणाऱ्यांना…’;निर्दोष मुक्ततेनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

धक्कादायक! ज्यांनी एकही लस घेतली नाही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा

गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोल पंपावर आमदाराची फसवणूक, डिझेल भरल्यावर काही अंतरावरच बंद पडली गाडी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More