बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे…”

मुंबई | राज्यात शिवसेना-भाजपची युती तुटली आणि शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी (Shivsena-Congress-NCP) हे तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी हे नवं समीकरण सत्तेत आलं. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. हे सरकार तीन पायांचं असून लवकरच पडेल, असा दावा नेहमी विरोधकांकडून केला जातो.

महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर असल्याचा टोलाही विरोधकांकडून लगावला जातो. या सगळ्या चर्चेदरम्यान शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ‘साम’ वृत्तवाहिनीला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) पदाबद्दल भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे अडीच वर्ष या पदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ पुडी, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद प्रदिर्घकाळ टिकणार असल्याचं प्रतिपादनही संजय राऊत यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा झाल्यामुळे नक्की काय ठरलं हे माहिती असल्याचंही राऊत म्हणाले. 2024 पर्यंत मुख्यमंत्री पूर्ण कालावधीने काम करतील यात शंका नाही. त्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जबाबदारी माझी”, गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

“हिंदुंची मंदीरं तोडली जाणार असतील तर आम्ही…”; भाजप आमदाराचा इशारा

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीबाबत ‘ही’ माहिती आली समोर, वाचा एका क्लिकवर

मुख्याध्यापकाचं निलंबन मागे घ्या; 521 विद्यार्थी आझाद मैदानावर काढणार मोर्चा

24 तासाच्या आत फासा पलटला, ‘तो’ ताज पुन्हा अंबानींच्या डोक्यावर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More