बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठी सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस, पाहा त्याचे आठवणीतील फोटोज्

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतला हरहुन्नरी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या लक्ष्याचा आज जन्मदिवस. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्याचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 26 ऑक्टोबर 1954 रोजी रत्नागिरी येथे झाला होता.

Photo Courtesy- Instagram\marathi_chitrapat_srushti

 

लक्ष्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पुढे त्यांनी शाळेत, कॉलेजमधील नाटक स्पर्धेत भाग घेण्यास सुरूवात केली. खरंतर या नाटकातूनच लक्ष्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.

 

Photo Courtesy-Instagram/all_in__one_________

 

नाटकांपासून सुरुवात करत लक्ष्याने चित्रपसृष्टीतही आपलं पाउल ठेवलं. लक्ष्याने 1984 साली लेक चालली सासरला या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर लक्ष्याच्या सुपरहिट अभिनयाची गाडी सुसाट सुरू झाली.

 

Photo Courtesy- Instagram

लक्ष्याचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे होते. परंतु अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, हमाल दे धमाल, धुमधडाका, दे दणादण यांसारख्या चित्रपटांची जादू आजही प्रेक्षकांवर तशीच टिकून आहे.

Photo Courtesy-Instagram\

अशी ही बनवाबनवी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला तो लक्ष्याच्या स्त्रीच्या भुमिकेमुळे मात्र यासोबतच या चित्रपटातील इतर कलाकार आणि लक्ष्यांची जमलेली केमिस्ट्रीही प्रेक्षकांना विशेष भावली. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्या यांच्या चित्रपटांनी आजही मराठी प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे.

photo Courtesy-Instagram\laxmikantberdeofficial\iindependentperson

 

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. पुढे यातूनच त्यांच्यात प्रेम फुलत गेलं आणि नंतर या दोघांनी लग्नही केलं. त्यांना स्वानंदी आणि अभिनय अशी दोन मुलं आहेत.

Photo Courtesy-Instagram\naviarthkranti

 

लक्ष्याला वयाच्या 50 व्या वर्षी गंभीर आजराने ग्रासल. त्यानंतर बरेच दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर लक्ष्याने 16 डिसेंबर 2004 रोजी अखेरचा श्वास घेतला.

थोडक्यात बातम्या-

11 महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आंदोलन मात्र सुरूच; पण आता पुढे काय?

देशातुन कोरोना लवकरच हद्दपार होणार?, 8 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार?, तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे!

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना?, महाविकास आघाडीला ‘या’ गोष्टीची भीती

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More