बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबादेत घुमला शिवरायांच्या नावाचा जयघोष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयतींचा राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे. यादरम्यानच शिवरायांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील क्रांती चौकात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या अश्र्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. आकर्षक रोषणाई आणि दिव्यांच्या झगमटाने क्रांती चौक लखलखला होता. तर शिवरायांच्या जयघोषाने औरंगाबाद दुमदुमले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पुतळ्याचं अनावरण करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या अश्र्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्र्वारूढ पुतळ्याची चौथऱ्यासह 52 फूट इतकी उंची आहे. क्रांती चौकातील महाराजांचा हा पुतळा देशातील सर्वाधिक उंच पुतळा आहे. पुतळ्याच्या अनावरणावेळी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 

थोडक्यात बातम्या-

सुशांत सिंह प्रकरणावर नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

राणे-शिवसेना वाद टोकाला! नारायण राणेंचा ‘अधिष’ महापालिकेच्या रडारवर

चंद्रकांत पाटलांनी दिला उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले “रश्मी ठाकरेंना सामनाच्या…”

धोनीच्या चेन्नईने कोट्यावधींना विकत घेतलेल्या ‘या’ युवा खेळाडूवर गंभीर आरोप

“पवार कुटुंबीयांचे शेअर्स आहेत की नाहीत…”; राजू शेट्टींचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More