बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘2 वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको, पण…’; टास्क फोर्सच्या सदस्यांचा पालकांना मोलाचा सल्ला

मुंबई | देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देशात सतत कमी होत आहे. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यानुसार पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्कची गरज नसल्याचं केंद्राने म्हटलं आहे. मात्र टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेगळं मत व्यक्त केलं आहे.

दोन वर्षांपुढील मुलांनी शक्यतो मास्क लावावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. 2 वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको. पण 2 वर्षांपुढील मुलांना शक्यतो मास्क लावावा, असं टास्क फोर्सच्या सदस्या डॉ. आरती किणीकर यांनी सांगितलं.

2 वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क लावल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ते मास्क तोंडावर ठेवत नाहीत. त्यामुळे 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या पालकांनी-घरच्यांनी मास्क लावावा. त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी मास्क लावावा, असं आरती किणीकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणं आवश्यक नाही, असं देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केलं होतं. तसेच सहा ते अकरा वर्षे वयोगटातील मुलांनी पालक आणि डॉक्टर यांच्या देखरेखीखाली मास्क वापरण्यास हरकत नाही. 18 वर्षे वयाखालील मुलांमध्ये कोरोनाचा होणारा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे, असंही केंद्राने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं शास्त्रज्ञांचीही उडवली झोप!

‘आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

“राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, त्यांच्या हाती महाराष्ट्र दिला पाहिजे”

उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, तर…’; अभ्यासातून नवी माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More