5 वर्ष शिक्षक अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार; निवृत्त झाल्यानंतर तिच्यासोबतच केलं असं काही…
हरियाणा | हरियाणातील हिसार जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. एका शाळेतील शिक्षक त्याच शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार करत असल्याचं उघड झालं आहे. संबंधित आरोपीचं नाव राजबीर असून हरियाणातील एका सरकारी शाळेत तो चित्रकला विषय शिकवत होता.
गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार सहन करणाऱ्या पीडित मुलीनं अखेर आरोपी शिक्षकाच्या तावडीतून स्वत: ची सुटका करून घेतली. त्यानंतर तिने तिच्या घरी जाऊन कुटुंबीयासमोर तिच्यासोबत होत असलेल्या शोषणाची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे.
आरोपी शिक्षक गेल्या पाच वर्षांपासून पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतर तो शाळेतून दोन वर्षांपुर्वी निवृत्त झाला. निवृत्त झाल्यानंतर देखील त्याने त्याचा घाणेरडा प्रकार चालूच ठेवला. यादरम्यान त्याने १९ वर्षांच्या संबंधित मुलीचं अपहरण केलं. तसेच तिचा बलात्कारदेखील केला आहे.
दरम्यान, आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो, एससी-एसटी कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
थोडक्यात बातम्या-
हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते पण…- दिया मिर्झा
‘या’ शहरात दिसलं काळजात धडकी भरवणारं चित्र; एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी
“…म्हणून मुंबई इंडियन्सने पुन्हा यावर्षीही आयपीएल जिंकावी”
शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.