बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिक्षकानं विद्यार्थिनीला दाखवला अश्लील व्हिडीओ, अत्यंत धक्कादायक प्रकारानंतर खळबळ

चंदिगड | शिक्षक म्हणजे गुरू,  आपल्या आयुष्याचा पाया पक्का करणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक. मात्र अशाच एका शिक्षकाने गुरु- शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. पंजाबमधील फगवाडा येथील एका खाजगी शाळेतील ही घटना आहे. एका शिक्षकाने त्याच्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला. त्यानंतर अत्यंत संतापजनक कृत्य केल्याचं उघड झालं आहे.

संबंधित शिक्षकानं विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थिनी आरोपी शिक्षकाकडे शिकवणीसाठी जाते. गेल्या सोमवारी पीडित मुलगी शिकवणीसाठी गेली असता आरोपीनं हे कृत्य केलं. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने मंगळवारी आपल्या पालकांना घटनेची माहिती दिली.

संपुर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी आरोपी शिक्षकाला काळं फासून त्याला बेदम मारलं आहे. एवढच नाही तर त्याला मुख्याध्यापकाकडे देखील नेण्यात आलं असून कारवाईची मागणी करण्यात आली. यानंतर शाळा प्रशासनाने तातडीनं कारवाई करत संबंधित शिक्षकाचं निलंबन केलं आहे. संबंधित घटना फगवाडा शहरातील सुभाष नगरच्या एसडी मॉडल स्कुलमधील आहे.

दरम्यान, आरोपी शिक्षक हा मुळचा हिमाचल प्रदेशचा रहिवासी आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी नवदीप सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून संबंधित घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचं पालन अशक्य- अमित शहा

औरंगाबादेत PSI आणि महिला हवालदाराचं सूत जुळलं, पत्नीसोबत केलं लज्जास्पद कृत्य

महिलेवर 11 जणांनी केला बलात्कार, त्यानंतर समोर आली धक्कादायक माहिती

माणसातला देव! रोज 200 ते 300 टन ऑक्सिजन पुरवण्यासा सुरूवात

जेसीबीचा दात मानेत घुसला आणि… काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More