बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संघाची सकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली पाहून या टोळीला मोठा धक्का बसला आहे”

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच हिंदु- मुसलमानांमध्ये मतभेद नाहीत, हिंदु- मुसलमान एक आहेत, असं वक्तव्य केलं आहे. भागवतांच्या या वक्तव्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी मोहन भागवतांवर टीका केली आहे. या टीकाकारांना आता केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, हिंदू-मुसलमानांविषयी संघाचा नेहमी हाच विचार राहिला आहे. संघाचे विचार समरसता, बंधुता आणि राष्ट्रवादाने परिपूर्ण आहेत. मात्र, समाजाची दिशाभूल करणाऱ्या टोळीने अगोदर समाजात संघाविषयी वाईट प्रचार केला होता.  संघाची सकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली पाहून या टोळीला आता मोठा धक्का बसला आहे.

तसेच संघाविषयी ज्या लोकांमध्ये चुकीचा समज होता, त्या लोकांचा भागवत यांच्या विधानामुळे आता गैरसमज दूर होईल. यापूर्वीही संघाच्या लोकांनी सेवेच्या माध्यमातून सामाजिक बंधुता जपण्यासाठी बरीच कामे केली आहेत, असं देखील अब्बास नकवी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाही एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेदाभेद करणं चुकीचं आहे. हिंदुस्थान हे एक राष्ट्र असून मुस्लिमांना आपली ओळख संपवण्याची किंवा नष्ट करण्याची काहीच गरज नाही. मुळातच हिंदू आणि मुस्लिम वेगळे नाहीत, असं मत मोहन भागवतांनी व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या –

‘हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा’; चित्रा वाघ आक्रमक

आनंदाची बातमी! देशातील वाढणारी कोरोना रुग्णसंख्या अखेर आली आटोक्यात

“शिवीगाळ झाली पण ती कोणी केली यासाठी भास्कर जाधवांची नार्को टेस्ट करा”

आठवणींना उजाळा! पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीनं शेअर केली पहिली पोस्ट

“शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More