बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंहाच्या घरापुढे पोहोचली टीम, दारावर चिकटवली ‘ही’ नोटीस

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh)  यांच्यावर 100 कोटी वसूलीचे खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेला सुरूवात केली आहे.

न्यायालयाकडून आता परमबीर सिंह यांना इशारा देण्यात आला आहे. जर परमबीर सिंह 30 दिवसांच्या आत न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे परमबीर सिंह न्यायालयात हजर राहिले नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या जुहू येथील घरासमोर न्यायालयाचा आदेश लावला आहे. पोलिसांनी लावलेल्या आदेशामध्ये परमबीर सिंह फरार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

17 नोव्हेंबर रोजी परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंह यांना मुंबई पोलिसांनी गोरेगाव वसूली प्रकरणी समन्स पाठवले होते. अनेकवेळा नोटीस पाठवूनही परमबीर सिंह गैरहजर राहिल्याने न्यायालयाने शेवटी परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. परमबीर सिंह देशातचं आहेत. ते कुठंही गेलेले नाहीत. तसेच ते पळूनही जाणार नाहीत. परंतु, परमबीर सिंह यांच्या जीवाला धोका आहे, असं त्यांच्या वकिलाने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

खुल्लम खुल्ला प्यार! प्रसिद्ध गायिकेचा किसिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लय जबरी पाऊस होणार!, महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

शाहरुख-गौरीचं टेन्शन मिटलं, कजरारे गाण्यावर दोघंही तुफान नाचले!, पाहा व्हिडीओ

चंद्रपूरच्या तरुणीनं अनेकांना फोडलाय घाम, पहिल्यांदा द्यायची नयनसूख अन् त्यानंतर…

पुण्यात मोठी खळबळ, तृतीयपंथीयासोबत घडला अत्यंत निर्घृण प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More