बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगभर थैमान घातलेल्या कोरोना मातेचं मंदीर जमीनदोस्त

नवी दिल्ली | कोरोना महामारीने सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली आहे. या महामारीला हरवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये कोरोना देवीचं मंदिर उभारण्यात आलं होतं. मात्र, शुक्रवारी रात्री हे मंदिर पाडण्यात आल्याची माहिती समजत आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांवर आरोप केले आहेत.

ग्रामस्थांनी केलेले सर्व पोलिसांनी आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हे मंदिर ज्या जागेवर उभारण्यात आलं होतं ती जागा वादात अडकली होती. त्यामुळे वादात सहभागी असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी हे मंदिर पाडलं आहे.

याप्रकारणाबद्दल बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, हे मंदिर लोकवर्गणीतून उभारण्यात आलं होतं. नोएडामध्ये राहणारे लोकेश, नागेश कुमार श्रीवास्तव आणि जयप्रकाश श्रीवास्तव यांच्या मालकीची ही जमीन आहे. या मंदिराच्या उभारणीनंतर लोकेश यांनी गाव सोडलं आणि नोएडाला परतले.

दरम्यान, या मंदिरात कोरोना मातेच्या नावाने एका मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या मूर्तीला मास्क देखील घालण्यात आलं होतं. मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला कोरोनाला रोखण्यासाठीचे उपाय देखील लिहिण्यात आले होते.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या घरात; पाहा दिलासादायक आकडेवारी

जबरदस्त! अखेर सांगलीच्या ‘या’ कंपनीला मिळाली कोरोना इंजेक्शनच्या मानवी चाचणीची परवानगी

‘…म्हणून महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल आहे ‘; पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा खुलासा

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 03 कोरोनाबाधितांचा

मृत्यूकोरोनामुळे मृत्यू झाल्यास ‘ही’ बँक वार्षिक उत्पन्नाच्या चार पट पैसे व 2 वर्ष पगार कुटुंबाला देणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More