बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवनीत राणांना आवरला नाही कैऱ्या खाण्याचा मोह, पाहा नेमका काय किस्सा घडला!

अमरावती | खासदार नवनीत राणा आज अमरावती शहरात फेरफटका मारण्यास गेल्या होत्या. मात्र, सार्वजनिक ठिकाणी गेले असताना नवनीत राणा यांनी पुन्हा मास्क न लावल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे.  यावेळी नवनीत राणा यांनी तोंडाला मास्क न लावण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडवला आहे.

शहरात फेरफटका मारत असताना नवनीत राणा यांनी एका कैरी विक्रेत्याकडून कैऱ्या विकत घेतल्या. एका चहाच्या दुकानावर चहाचा आस्वाद घेतला. चहा बनविणाऱ्या व्यक्तीची विचारपूस केली. सोबतच चहावाल्यासोबत एक सेल्फी देखील काढला.

यानंतर एका हातगाडीवर डोसेवाला डोसा बनवत होता. त्या डोसेवाल्यासोबत त्यांनी स्वतः डोसा बनवला. यानंतर त्यांनी डोस्याची चव देखील चाखली. मात्र, या सर्व गोष्टी करताना त्यांनी मास्क न लावता कोरोनाच्या सर्व नियमांचं उल्लंघन केलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच नवनीत राणांवर टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं राजापेठ पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रवी राणा यांनी भुयारी मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी विना मास्क गर्दी जमवली होती.

थोडक्यात बातम्या –

कौतुकास्पद! कोरोना संकटात ‘या’ शाळा मालकांनी 1000 विद्यार्थ्यांची वर्षभराची फी केली माफ

सर्वोच्च स्तरापेक्षा सोनं तब्बल 8211 रुपयांनी घसरलं; वाचा ताजे दर

ईशा देओल ‘या’ वेबसीरीजमधून करणार डिजीटल क्षेत्रात पदार्पण!

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत झाली लक्षणीय घट

‘मी काय ईडीचा प्रवक्ता नाही’; खडसेंच्या ईडी चौकशीवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More