बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगाचं टेंशन वाढलं!; कोरोना गेला नाही तेच नोरो व्हायरसचा धुमाकूळ

लंडन | जगभरात सर्वत्र कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाची धास्ती संपत नाही तोच आणखी एका विषाणूची एण्ट्री झाली आहे. या नवीन विषाणूचं नाव नोरो व्हायरस असून त्यानंही कोरोनासारखं आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत या विषाणूचं प्रमाण वाढलं असून ब्रिटनमध्ये हा विषाणू आढळला आहे.

ब्रिटनमधील कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशात आतापर्यंत नोरो व्हायरसचे 154 रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसचा वेगानं फैलाव होत असल्यानं तेथील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला प्रचंड सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नोरो व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं इंग्लंडमध्ये पुन्हा कडक निर्बंध करण्याची वेळ आली आहे.

कोरोना व्हायरसपेक्षा नोरो व्हायरस अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. नोरो व्हायरसची लागण झाल्यावर तीन दिवसांपर्यंत त्याची लक्षणं दिसत राहतात. मात्र पुढच्या महिन्याभरात त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात.

दरम्यान, पोटोचा फ्लू या नावानं देखील नोरो व्हायरस ओळखला जातो. दुषित अन्न खाल्यामुळे, उघड्यावरचे प्येय प्यायल्यानं, या विषाणूचा संसर्ग होतो. आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे की हा विषाणू टाळण्यासाठी कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल.

थोडक्यात बातम्या –  

खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जात केले गंभीर आरोप

मिकाचा राज कुंद्राला पाठिंबा; म्हणतो, “मी अॅप बघितलं, त्यात फार काही नव्हतं”

“लॉकडाऊन उठवा… अन्यथा रस्त्यावर उतरुन आम्ही स्वतः दुकानं उघडी करु”

कोरोनाचं संकट जात नाही तेच दुसरं संकट, बर्ड फ्ल्यूमुळे देशात पहिला मृत्यू

Ind Vs Sri: चहरनं केला कहर, भारत हारता हारता वाचला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More