Maharahstra l सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे जोमाने फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बैठकांचा जोर सुरु आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य मंत्रीमंडळाने घेतला मोठा निर्णय! :
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्ष या पदाचा कालावधी 5 वर्ष करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी 2.5 वर्ष होता. मात्र आज घेतलेल्या निर्णयामुळे हा कालावधी 2.5 वर्षांहून 5 वर्ष करण्यात आला आहे. तसेच येत्या काही दिवसांवर नगरपंचायत आणि नगरपालिका याची सोडत निघणार होती, त्यासाठी राज्यातील कित्येक इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष या पदाची स्वप्न रंगवत होती, मात्र आता ती स्वप्न धुळीस मिळवली आहेत.
राज्यात तब्बल 228 नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत यांची सार्वत्रिक निवडणुक घेतली जाते. या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पदाचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो. मात्र या कालावधीपैकी 2.5-2.5 वर्षांचे असे दोन अध्यक्ष निवडले जातात. मात्र अवघ्या काही दिवसांवर पहिल्या टप्प्याच्या नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यकाळ संपणार होता. मात्र त्याआधीच नगराध्यक्ष या पदाचा कालावधी 2.5 वर्षावरुन तब्बल 5 वर्षांवर करण्यात आला आहे.
Maharahstra l नगराध्यक्ष पदाचा कालावधी अडीच वर्षांहून केला 5 वर्षे :
राज्यातील कित्येक नगरपंचायत, नगरपालिका आणि महापालिकांमध्ये प्रशासन राज आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने त्या ठिकाणावरील नगराध्यक्षद पदाची खुर्ची ही रिकामीचं असून तो पदभारही देखील प्रशासनाकडे आहे. अशातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील उर्वरीत नगर पंचायतींमधील नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी 5 वर्षांचा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात 105 नगर पंचायतीच्या निवडणुका 2.5 वर्षापूर्वी पार पडल्याने अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. मात्र, या नगराध्यक्ष पदाचा कालावधी हा या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत आतापर्यंत निघणे गरजेचे होते. मात्र आता, राज्य सरकारने 2.5 वर्षांचा कालावधी वाढवून तो आता थेट 5 वर्षांचा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
News Title : The term of office of the Mayor was 5 years
महत्वाच्या बातम्या-
…असं झालं तर वाहनांची किंमत तब्बल 4 लाख रुपयांनी कमी होणार
“मी संसदेत प्रश्न मांडते तेव्हा मझ्या पतीला…”; सुप्रिया सुळेंचा अत्यंत गंभीर आरोप
“अजित पवार बारामतीत पराभूत होणार”; ‘या’ खासदाराने केली भविष्यवाणी
“आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार”
ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांवर, चांदीचेही दर वाढले