खड्ड्यांवरुन ठाकरे बंधूंमध्ये जुंपली; अमित ठाकरेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुंबई | महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या घडामोडी होताना दिसत आहेत. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. अशातच आता ठाकरे बंधुमध्ये वाद-विवाद होताना दिसत आहे. नुकतंच मनसे नेते अमित ठाकरे यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले होते.

मनसे नेते अमित ठाकरे हे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी रस्त्यांच्या झालेल्या बिकट परिस्थितीवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अमित ठाकरेंच्या या टीकेला आता आदित्य ठाकरे यांनी चांगलंच सडकावून उत्तर दिलं आहे.

आपल्या सगळ्यांना मुंबईवर विश्वास आहे, बीएमसीवर विश्वास आहे. आपण जे काम करतो ते काही एका रात्रीत होणार नाही… ते काम आपल्याला करावा लागतं, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, अमित ठाकरे यांनी रस्त्यांची झालेली बिकट परिस्थिती पाहून सरकारवर निशाणा साधला. याशिवाय त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतही सरकारवर संताप व्यक्त केला होता.

थोडक्यात बातम्या –  

काँग्रेस पक्ष हेडलेस असल्यानं भाजप नेते त्याचा फायदा घेत आहेत – संजय राऊत

कंगना रणौत योगींच्या भेटीला, ‘या’ मोहिमेची बनली ब्रँड अॅम्बेसिडर

….अन् या पठ्ठ्याने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका”

“महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाकीत होत आहेत, भाजपने ज्योतिषी बदलावा”

Aditya ThackerayMNS leaders Amit ThackerayMunicipal electionspitsTHACKERAY GOVERNMENTआदित्य ठाकरेखड्डेठाकरे सरकारमनसे नेते अमित ठाकरेमहानगरपालिकेच्या निवडणुका