बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोमय्यांच्या रडारवर आता थेट ठाकरे परिवार; अलिबागला जाऊन बंगल्यांची पाहणी करणार

पुणे | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आता थेट ठाकरे परिवाराचा घोटाळा उघडकीस आणणार असं म्हणत आहेत. ठाकरे आणि सोमय्या असा सामना आता पाहायला मिळणार आहे. ठाकरे परिवारावर टीका केल्यावर शिवसेना आपल्या जुन्या शैलीत त्यांना उत्तर देताना पहायला मिळू शकते.

किरीट सोमय्या यांना कोल्हापूर पोलिसांनी जिल्हा बंदी केल्यानंतर त्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना सोमय्या सर्व मंत्र्यांवर आरोप करत आहेत. हसन मुश्रीफ यांचा तीसरा घोटाळा उघडकीस आणण्याचा निर्धार यावेळी सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली आहे. सामनाच्या संपादक आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावरील जमीन तपासणार असल्याचं सोमय्या यांनी म्हंटलं आहे. परिणामी सोमय्या आणि शिवसेना यांच्यात जोरदार राजकीय युद्ध पेटणार आहे.

सोमय्या भ्रष्टाचाराची राज्यातील नेत्यांची प्रकरणं बाहेर काढत आहेत. यापुर्वी सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता थेट शिवसेनेच्या ठाकरे घराला लक्ष्य केल्यानं राज्याचं राजकारण पेटण्याची चिन्हं आहेत.

थोडक्यात बातम्या 

औरंगाबादमध्ये भीषण अपघात; आई ठार तर दोन चिमुकले गंभीर जखमी

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलिसांनी किरीट सोमय्यांना रेल्वेतून उतरवलं, राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता

…म्हणून पोलीस आयुक्तांनी मानले पुणेकरांचे आभार!

पहिला घोटाळा बाहेर काढताच दवाखान्यात गेले, दुसरा काढला तर….- किरीट सोमय्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More