बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट पैसे जमा केले”

मुंबई | काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं होतं. त्यात त्यांनी समाजातील काही घटकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बांधकाम कामगारांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत पोहचली असल्याचं कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केल्याप्रमाणे 9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे, अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मागील चार दिवसांमध्ये कामगार विभागाच्या वतीने 137 कोटी 61 लाख रुपयांचा निधी थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं होतं. त्यात त्यांनी अनेक उपेक्षित घटकांना अर्थसहाय्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. त्यानुसार आता बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 1500 रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचालक , बांधकाम कामगार, फेरीवाले अशा अनेक समाजघटकांना समोर ठेऊन आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानंतर आता बांधकाम कामगार यांना सरकारी लाभ मिळाला आहे, तर इतरांना देखील लवकरच आर्थिक सहाय्य मिळू शकणार आहे, अशी आशा आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण!

उद्या बहिणीचं लग्न, आज भावाचा दुर्दैवी मृत्यू; इचलकरंजीतील हृदयद्रावक घटना

लस घ्याच! लसीकरणानंतर मृत्यूचं प्रमाण केवळ 0.00005 टक्के

‘…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या टीकेला आदित्य ठाकरे यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More