बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारची ‘ही’ मोठी कारवाई

अहमदनगर | गेल्या काही महिन्यांपासून राहुरीतील डॉ. बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. कर्जपुरवठा आणि अन्य प्रश्न सोडवून गाळप हंगाम सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यातही अडचणी येऊ लागल्या होत्या. पुढच्या वर्षी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणार असल्यानं आता कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सुजय विखे पाटलांनी पुन्हा कारखान्याचं पुनरूज्जिवन केलं. त्यातच आता ठाकरे सरकारने सुजय विखे पाटलांना मोठा धक्का दिला आहे.

राहुरी येथील डॉ. बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखाना हा सध्या सुजय विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे. या तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर आता महावितरणने मोठी कारवाई केली आहे. या साखर कारखान्याला करण्यात येणारा वीज पुरवठा महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या महावितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे आता कारखान्याचं कामकाज ठप्प झालं आहे.

अनेकदा नोटीस पाठवून देखील कारखान्यानं थकित असलेलं वीजबिल भरलं नव्हतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचा फटका आता कामगार वसाहतींना होताना दिसत आहे. वीज नसल्यानं त्या भागात काळोख पसरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना आर्थिक टंचाईत आहे. तर कामगारांची देणी देखील थकली आहेत.

दरम्यान, डॉ. बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखाना हा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात येतो. आर्थिक टंचाईमुळे हा साखर कारखाना गेल्या काही वर्षापासून बंद होता. त्यानंतर सुजय विखे पाटील यांनी हा कारखाना ताब्यात घेतला होता. परंतू, त्यानंतर देखील प्राजक्त तनपुरे आणि सुजय विखे पाटील यांनी वाकयुद्ध पाहायला मिळालं होतं.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही होतोय कोरोना संसर्ग

मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील – राजेश टोपे

खासगी शाळांची फी 15 टक्क्यांनी कमी होणार?, राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

केबीसीमध्ये लखपती झालेल्या डॉ. दीपा शर्माचा दरड दुर्घटनेत मृत्यु

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More