मुंबई | शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचा निर्णय माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला होता. शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन करण्याची महाविकास आघाडी सरकारने घोषणा केली होती. मात्र, ऑनलाइन बदलीचं धोरण कायम ठेवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे तसेच शिक्षक बदली धोरण अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद, सदस्य डाॅ. संजय कोलते, कान्हुराज बगाटे, सर्जेराव गायकवाड, विनय गौडा यांनी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याबरोबर चर्चा केली.
27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहमती दर्शवली. तसचं जून 2021 पूर्वी राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्या जातील, असंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन होत होत्या, तेव्हा राजकीय हस्तक्षेप जास्त होता. तो मोडीत काढण्यासाठी पंकजा मुंडेंनी तो निर्णय घेतला होता.
थोडक्यात बातम्या-
‘राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
“…तुम्ही पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवा, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नका”
“बारामती अॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा मग गाझीपूरला जावा”
क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का; कंगणाचा रोहितला रिप्लाय“मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार”