Top News राजकारण

ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांची टीका

File Photo

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय.

सुप्रीम कोर्टाने पत्रकार अर्णव गोस्वामी आणि हायकोर्टाने अभिनेत्री कंगणा राणावत यांच्याबाबत दिलेले निकाल हे ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीचे कारनामे आहेत. हे निकाल पाहता या सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.

फडणवीस पुढे म्हणाले, “ठाकरे सरकारने किती पत्रकारांवर कारवाई केली तसंच सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई केली त्याची संपूर्ण यादी आहे. यांनी अप्रत्यक्ष आणीबाणी लादली आहे. शिवाय लोकशाहीची हत्या या सरकारने केलीये.”

दरम्यान उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही”

ज्यांनी चिरडण्याची भाषा केली ते फार काळ टिकले नाहीत- देवेंद्र फडणवीस

“उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“असा अचानक झालेला काळाचा घाला सर्वांना धक्का देणारा आहे”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या