बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे 3 महत्वाचे निर्णय; पाहा एका क्लिकवर

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. कोरोना संकटामुळे राज्यात आरोग्यसेवे व्यतिरिक्त आर्थिक, सामाजिक तसेच अन्य समस्या देखील समोर होत्या, यावर आता  ठाकरे सरकारने मोठी पावलं उचलत 3 मोठे निर्णय घेतले आहेत.

कोरोनाचे अनाथ झालेल्या बालकांचा खर्च सरकार उचलणार-

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्यानं अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर 5 लाख रुपयांची मुदत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन सरकारी योजनेतून खर्च उचलण्याचा निर्णय झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनाथ मुलांच्या पुढील आयुष्यासाठी हातभार लागणार आहे.

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना-

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी 10 वसतिगृह सुरु होणार आहेत. नवीन वसतिगृहे बांधेपर्यंत ही वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरु होतील, असं देखील बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पदभरती –

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील उद्योग संचालनालय व क्षेत्रीय कार्यालयातील उद्योग निरीक्षक (गट क, अराजपत्रित) या पदाची निवड यापुढे जिल्हा निवड समितीकडून न करता आता, ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

मी पुराव्यांसह सांगतोय, कोरोनामुळे झालेल्या मृत्युसाठी मोदीच जबाबदार- असदुद्दीन ओवैसी

‘तुझ्या बापाला’ म्हणत किशोरी पेडणेकरांचं नेटकऱ्याला रोखठोक उत्तर!

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

‘या’ राज्याने 12 वीच्या बोर्डाची परीक्षा केली रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची- मुख्यमंत्री

दोन चित्रपटांनंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर; मेकर्सनं केला खुलासा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More