महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या नावाने ठाकरे सरकार लागू करणार ‘ही’ योजना!

मुंबई | महाविकास आघाडी सकारची राज्यात ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ लागू करण्याची योजना आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे असलेली ही योजना देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेशी जोडण्यात येणार आहे.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेवर पुढील तीन वर्षात 1,00,000 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसापासून ही योजना लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.

ही योजना लागू झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडून येतील, असा दावा राज्य सरकारने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझं भांडण तरीही मी भाजपसोबत”

…म्हणून क्रिकेटपटू मनदीप सिंह शेतकऱ्यांच्या आंदोलनात झाला सहभागी

दुचाकीवरुन प्रवास करणारांसाठी आता नवे नियम; पाळले नाहीतर कारवाई होणार!

“मोदी सरकारमधील नेत्यांना 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती आहे”

     

    मेलवर बातम्या मिळवा

    खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

    ताज्या बातम्या