बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा, म्हणाले…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आता आगामी हिवाळी अधिवेशात महिलांसाठी ठाकरे सरकार महत्वाचं पाऊल उचलणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यात पोलिसांचा वचक कमी झाल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी पोलीस दलाने अधिक दक्ष आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षितेसाठी शक्ती कायदा आणण्यात आला होता. राज्याच्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर करणार असल्याचं माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात यावी. या तक्रारीचा तपास, पुरावे जमा करण्यास प्राधान्य द्यावं. अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करावं, अशा न्यायालयीन प्रकरणांना गती देण्यासाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा करावा, असंही वळसे-पाटील यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, शक्ती कायद्याबाबतचे प्रारूप विधानसभेत मांडण्यात आलं आहेत.  कायदा परिपुर्ण होण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.  या समितीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर करणार असल्याचंही वळसे-पाटील यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुख फरार ???; भाजपच्या आरोपावर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

कर्णधार कोहलीच! कर्णधारपदाच्या संभाव्य चर्चेवर बीसीसीआयचं स्पष्टीकरण

गडकरींची टोलेबाजी! “आमदारांना मंत्री न झाल्याचं दु:ख आहे तर, मंत्र्यांना…”

मुलींना शिक्षण देण्यास तालिबानची परवानगी; मात्र घातल्या ‘या’ जाचक अटी

“अहो राऊत, तुम्ही कधीपासून मुंबईचे पोलीस आयुक्त झालात?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More