बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शेतकऱ्यांना चिरडणारी थार कार आमचीच…’; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची कबुली

लखनऊ | केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. केंद्रातील मोदी सरकारही या आंदोलनाबाबत काही पाऊल उचलताना दिसत नाही. मात्र रविवारी मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेे. देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता अजय मिश्रा यांनी गाडी त्यांचीच असल्याची कबुली दिली आहे.

पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय शेतकऱ्यांना चिरडणारी थार कार आमचीच होती, ती आमच्या नोंदणीकृत असल्याचं अजय मिश्रांनी कबुल केलं आहे. मात्र ती गाडी घेऊन काही कार्यकर्ते कोणाला तरी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी माझा मुलगा कार्यक्रमात होता. त्या कार्यक्रमात हजार लोक होते, ते सांगू शकतात की माझा मुलगा कार्यक्रमात होता, असं देखील अजय मिश्रांनी म्हटलं आहे.

गाडीबाबत बोलताना, हिंसाचारात कारचालकचा मृत्यू झाला, अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असल्याचं अजय मिश्रांनी सांगितलं आहे. या सर्व प्रकारानंतर आता  अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलकांच्या गर्दीत गाड्या घुसवल्याने मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यानंतर काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना पोलिसांनी लखीमपूरला जाण्यापासून अडवलं. यावरूनही राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रुग्णालयात दाखल

शिवसेना खासदार पुत्राचा पालघरमध्ये पराभव

कायदा मोडणार नाही, पण लखीमपूरला जाणारच; राहुल गांधींचं मोठं स्पष्टीकरण

धुळ्यात अमरिशभाईंचाच डंका; सर्वच जागांवर भाजपने मारली बाजी

यंदाच्या दसरा मेळाव्याविषयी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More