बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भररस्त्यात महिलेचं मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळाला, पाहा व्हिडीओ

ठाणे | ठाणे जिल्ह्यतील टिटवाळा येथे शुक्रवारी दिवसाढवळ्या भररस्त्यात एक चोरटा महिलेचं मंगळसूत्र हिसकावून पळून गेल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली झाल्यानं पोलिसांनी अवघ्या दोन तासात या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मांडा परिसरात राहणाऱ्या रिमा ओंकार कुंभार या शुक्रवारी रस्त्याने चालत चालल्या होत्या. यावेळी आरोपी रोहिदास शांताराम वेढे रस्त्याच्या बाजूलाच उभा होता. रिमा त्याच्याजवळ पोहचताच या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि तिथून लंपास झाला.

यानंतर रिमा यांनी तातडीने टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. ही घटना सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाल्याने पोलिसांना या फुटेजची तपासात मोठी मदत झाली. पोलिसांनी अवघ्या दोन तासात चोराचा शोध घेतला आणि त्याला गजाआड टाकलं.

दरम्यान, आरोपी रोहिदास वेढे हा मूळचा अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सध्या मांडा येथील चाळीत राहत होता. रिमा यांचे चोरलेले दागिने पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. यापूर्वी आरोपीने अशी चोरी केली आहे का? याचा पोलीस तपास घेत आहेत.

थोडक्यात बातम्या –

हार्दिक पांड्याची जागा ‘हा’ आयपीएल गाजवणारा खेळाडू घेऊ शकतो- सुनिल गावसकर

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

स्वदेशी भोगी विपत्ति, सांगे वडिलांची कीर्ती- अतुल भातखळकर

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

“…म्हणून दुसऱ्या डोसनंतरही पुण्यातील नागरिकांना होतेय कोरोनाची लागण”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More