लखनऊ | उत्तरप्रदेशात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलिस दलाला मान खाली घालायची वेळ आली आहे. पोलिस दलात कार्यरत असलेला आदेश कुमार हुसेनजंग येथील व्ही मार्ट शाॅपिंग माॅलमध्ये गेला होता. त्याने माॅलमधील 3 नवेकोरे शर्ट घालून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि माॅलच्या कर्मचाऱ्यांच्या हाती लागला.
संबंधित पोलिस कर्मचारी 21 फेब्रुवारीला हुसेनजंग येथील व्ही मार्ट शाॅपिंग माॅलमध्ये गेला होता. माॅलमधल्या ट्रायल रूममध्ये जाऊन त्याने तिथले नवेकोरे 3 शर्ट एकावर एक घातले, त्यावर पोलसांचा गणवेश घातला. गणवेशाखाली नवे शर्ट लपवून माॅलमधून बाहेर पडत होता. पण प्रत्येक शर्टवर असणाऱ्या बारकोडमुळे मेटल डिटेक्टरमधूल जातांना अलार्म वाजला. आणि तो पकडल्या गेला.
माॅलच्या सुरक्षा रक्षकांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्यांना त्याच्या गणवेशाखाली 3 नवे शर्ट लपवल्याच आढळून आलं. कर्मचारी संतापले आणि त्याला चांगलंच बदडून काढलं. माॅलमधील आजूबाजूच्या काही लोकांनी त्याचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला.
दरम्यान, पोलिस आयुक्त डी. के. ठाकुर यांनी गोमतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तैनात असणाऱ्या सदर पोलिस कर्मचाऱ्याला निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच कुमारला मारहाण करणाऱ्यांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.
थोडक्यात बातम्या –
शरद पवार माझा बापच आहे, मला आज त्यांची आठवण येतीये- चित्रा वाघ
…म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय- आनंद महिंद्रा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…
“नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक वाटतं ते मुर्खांच्या नंदनवनात फिरतायेत”
धक्कादायक! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
Comments are closed.