बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अदानी समूहाची गरूडभरारी! ‘100 अब्ज डाॅलर्स’ कमवत ठरली देशातली ‘या’ क्रमांकाची मोठी कंपनी.

नवी दिल्ली | भारतातील उद्योग क्षेत्रात आतापर्यंत दोनच बादशहा मानले जात होते. एक म्हणजे टाटा समुहाचे मालक रतन टाटा आणि रिलायन्य समूहाचे मालक मुकेश अंबानी. आता या दोन महारथींंना टक्कर देण्यासाठी उद्योग क्षेत्रात आणखी एका नावाची चर्चा रंगत आहे. अदानी समुहाचे मालक गौतम अदानी यांचं नाव आता उद्योग क्षेत्रात अग्रक्रमाने घेण्यात येणार आहे. अदानी समूहाने नुकतच त्यांच्या कंपनीचं मार्केट कॅपिटल 100 अब्ज डाॅलर्सच्या घरात नेलं आहे. 

उद्योगपती गौतम अदानी यांच्या आधी 100 अब्ज डाॅलर्सचं मार्केट कॅपिटल असलेल्या दोनच कंपन्या भारतात होत्या. टाटा आणि रिलायन्स समूहानंतर अदानी समूह भारतातील तिसरा मोठा समूह ठरला आहे. अदानी समूहाचे शेअर मार्केटमध्ये 6 शेअर आहेत. त्यातील 4 शेअर मंगळवारी बाजार उघडताच तेजीत आहे. तर त्यातील 2 शेअर तोट्यात होते. मात्र चार शेअरच्या वाढीनंतर अदानी समूहाच्या मार्केट कॅपिटलने शंभरी गाठली.

मंगळवारी अदानी एन्टरप्राईजेसचा शेअर 5.6% ने वाढला. त्यानंतर शेअरची किंमत 1202 वर पोहचली. तर अदानी गॅसच्या शेअरमध्ये देखील 6% ची मोठी वाढ झाली. त्यानंतर शेअरची किंमत वाढून 1248 वर पोहचली. अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये देखील अनुक्रमे 5 आणि 4 टक्यांची वाढ झाली आहे.

दरम्यान, टाटा समूहाचं मार्केट कॅपिटल 242 अब्ज डाॅलर्स इतकं आहे. भारतातली ही सर्वात मोठी कंपनी आहे. तर या पाठोपाठ रिलायन्स समूहाचं मार्केट कॅपिटल हे 190 अब्ज डाॅलर्स इतकं आहे. त्यानंतर आता अदानी समूहाची मार्केट कॅपिटल 104 अब्ज डाॅलर्स इतकं झालं आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षातच गौतम अदानी यांनी ही मोठी झेप घेतली आहे. 

थोडक्यात बातम्या-

“येत्या 40 दिवसात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल”

करिनाच्या धाकट्या लेकाचा फोटो चुकून झाला व्हायरल; असा दिसतो तैमुरचा लहान भाऊ

आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

आयपीएलआधीच शुभमन गिलचा ट्रेलर; 35 चेंडूत काढल्या एवढ्या धावा

गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More