बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात कोरोनाची तिसरी लाट ‘या’ तारखेपासूनच सुरू झाली, वैज्ञानिकांनी केला धक्कादायक दावा!

हैदराबाद | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू होती. दुसरी लाट ओसरत नाही, तर वैज्ञानिकांकडून तिसरीही लाट येणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. अशातच पुन्हा देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर वैज्ञानिकांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

हैदराबाद विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि एका वरिष्ठ भौतिकशास्त्रज्ञाने भितीदायक दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, भारतात 4 जुलैपासूनच कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असण्याची शक्यता आहे.

डॉ. विपिन श्रीवास्तव यांनी 24 तासांच्या काळात संसर्गामुळे झालेले मृत्यू आणि त्या काळात उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या यातले प्रमाण याचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला आणि त्याला डीडीएल असे नाव दिले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी आम्ही डीडीएलमध्ये चढउतार पाहिले होते. परंतू, त्यावेळी संसर्गामुळे मृत्यूंची आकडेवारी 100च्या संख्येत होती. आणि त्यामुळे आपण हे संकट संपत आल्याच्या भ्रमात होतो. मात्र नंतर स्थिती भयंकर झाली. तशीच परिस्थिती 4 जुलैपासून दिसून येत असल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर स्वरूप पाहता जनता आणि शासनाला अधिक सावधान राहावं लागणार आहे. खूप जास्त नकारात्मक असलेले डीडीएलही चांगले नसते, कारण याचा अर्थ असा होतो की, 24 तासांत बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत या काळात नव्या रुग्णांची संख्या जास्त वेगाने वाढत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

माजी राज्यमंत्र्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

राज्यात डिसेंबरपर्यंत पोलिस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा

“संजय राठोडांना विरोध केला तर परिणाम भोगावे लागतील”

परभणीत 24 तासात 232 मिमी पावसाची झाली नोंद; 233 मेंढ्या गेल्या वाहून

अर्धांगवायूचा झटका आला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – अमोल मिटकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More