बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची तिसरी लाट पुढील 6 ते 8 आठवड्यात येण्याची शक्यता”

नवी दिल्ली | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशात एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट टाळता येत नाही, असं रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय.

आता आम्ही अनलॉक करणं सुरू केलं आहे, परंतू पुन्हा कोविडशी संबंधित व्यवहारांचा अभाव दिसत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाट दरम्यान जे घडले, त्यावरून आपण काही शिकलो आहोत असे दिसत नाही. लोक पुन्हा एकत्र येऊ लागले आहेत, असं एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

पुढील 6 ते 8 आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते किंवा कदाचित याला थोडासा वेळ लागू शकेल. आम्ही कोविडशी संबंधित नियम कसे हाताळत आहोत आणि गर्दी टाळत आहोत यावर अवलंबून आहे, असं रणदीप गुलेरियांनी म्हटलंय. ते ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार, मुलांमध्ये हाय सीरो-पॉझिटिव्हिटी असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे असं म्हटलं जात आहे की तिसऱ्या लाटेचा फारसा परिणाम मुलांवर होणार नाही.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली, तरी तिसऱ्या लाटेचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच ‘डेल्टा प्लस’ प्रकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच कारण बनू शकतो, अशी शक्यता देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न शिवसेनेनं पूर्ण केलं; त्यांच्याच विचारधारेवर शिवसेना पुढे जातीये”

“राणे नावाने शिवसेना घाबरते, पुन्हा समोर आल्यास जोरदार उत्तर द्या”

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या- प्रविण दरेकर

30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More