बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, एसबीआयच्या अहवालाने चिंता वाढली!

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेबद्दल चिंता वाटू लागली आहे. तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक ठरणार असून देश त्याला सामोरे जाण्यासाठी किती तयार असेल, हा मोठा प्रश्न आहे. तिसऱ्या लाटेविषयी स्टेट बँक ऑफ इंडियानं एक अहवाल सादर केला आहे. कोरोनाची लाट देशात देशात पुढच्याच महिन्यात येईल असा अंदाज या अहवालात बांधण्यात आला आहे.

सध्याच्या अहवालानुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास 10 हजार रुग्ण आढळून येतील. तर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात ही संख्या वाढलेली असेल, असं एसबीआयच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. तिसऱ्या लाटेचा प्रभाव 98 दिवसांपर्यंत जाणवेल असंही सांगण्यात आलं आहे.

नीति आयोगाचे सदस्य डॉ. वी.के.पॉल म्हणाले की, कोरोना व्हायरसचे स्वरुप बदलले तर त्याचा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन ते तीन टक्के मुलांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ शकते. मुलांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, दुसऱ्या लाटेइतकी तिसरी लाट गंभीर असेल, याबाबत ठोस सांगता येत नाही. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकारनं लसीकरण मोहीम राबवली आहे. याचा फायदा लोकांना होईल. तसेच दुसऱ्या लाटेच्या तुलनेत लोकं कमी मरतील असा अंदाज आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“शिवीगाळ झाली पण ती कोणी केली यासाठी भास्कर जाधवांची नार्को टेस्ट करा”

आठवणींना उजाळा! पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीनं शेअर केली पहिली पोस्ट

“शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?”

“भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल”

मोठी बातमी! अखेर महाराष्ट्रात शाळेची घंटा वाजणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More