बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर कोरोनाची तिसरी लाट अधिक धोकादायक ठरेल’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

नवी दिल्ली | लसीकरणाची परिस्थिती अशीच राहिली तर तिसरी लाट अधिक धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जर दिल्लीमध्ये कोरोना लसीकरणाची स्थिती अशीच राहिली तर तिसरी लाट धोकादायक रूप घेऊ शकते, असं डॉ. युद्धवीर सिंग यांनी सांगितलं आहे.

दिल्लीमध्ये खूप कमी लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणे आवश्यक आहे. खासगी लसीकरण केंद्रातील लसींचे दर निश्चित केले गेले पाहिजेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांना लस मिळणे शक्य होईल, असंही डॉ. युद्धवीर सिंग म्हणालेत.

ड्राइव्ह थ्रू व्हॅक्सिनेशनबाबत एकदा विचार करण्याची गरज आहे. कारण यामुळे ऑब्झर्वेशन प्रक्रिया समाप्त झाली आहे. लसीकरणानंतर अर्ध्या तासापर्यंत निरीक्षणाखाली राहणं आवश्यक आहे. मात्र ड्राइव्ह थ्रू व्हॅक्सिनेशनमध्ये असं होत नाही आहे. तसेच लसीची कोल्ड चेन मेंटेन करण्यामध्येही अडथळे येत आहेत. त्यामुळे ड्राइव्ह थ्रू व्हॅक्सिनबाबत पुन्हा विचार होणं आवश्यक आहे, असं डॉ. युद्धवीर सिंग म्हणाले.

दरम्यान, लसीकरण हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर अधिकाधिक लोकांचं लसीकरण झालं तर तिसऱ्या लाटेचा धोका हा कमी असेल. मात्र लसीकरण झालं नाही आणि आता आहे तशी परिस्थिती असे तर मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं, असं मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. विवेका कुमार यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था केलीये- अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

“पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?”

…अन् संजय दत्त अचानक पोहोचला मंत्री नितीन राऊत यांच्या घरी!

राज-उद्धव एकत्र येतील का?; उद्धव ठाकरे म्हणतात…

“अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More