बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तहानलेल्या गरूडाची तरूणाने अशा पद्धतीने भागवली तहान, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली |  या जगामध्ये प्रत्येकजण आपल्या मनाचा राजा असल्यासारखा वागत आहे. माणूस मनाला वाटेल तसं, वाटेल ते काहीही करत आहे. आधीच्या काळी माणसं- माणसांना धरून ठेवायची. परंतू, आता शेजारून गेली तरी अनोळखी असल्यासारखी वागतात. माणसांमध्ये माणुसकी नावाची गोष्टचं संपून गेलीय असं वाटतं.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच सध्या उन्हाळा ऋतू सुरू असल्यामुळे, वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये वारंवार आपल्या घशाला कोरड पडते. सारखं पाणीही प्यावसं वाटतं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरूण तहानलेल्या गरूडाला पाणी पाजत असल्याचं दिसून येत आहे.

व्हिडीओमध्ये एका रस्त्यावर एक गरूड तहानलेला असून, एक तरूण त्याला बाटलीने पाणी पाजत आहे. गरूडाला खूप जास्त तहान लागली असल्यामुळे ते गरूडही पटपट पाणी पित असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील हे दृश्य पाहून माणसामध्ये अजूनही थोडीतरी माणूसकी शिल्लक असल्याचं दिसून येत आहे.

त्या ठिकाणी तरूणासोबत आणखी तिघेजण आहेत. त्यातील एकजण रस्त्यावर खाली बसला आहे. तर दुसरा गरूडाच्या मागे बसला आहे. तिसरा या सगळ्याचं आपल्या मोबाईलमध्ये शूट करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. त्याचप्रमाणे काहींनी त्या तरूणाचं कौतुकही केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

पत्रकाराच्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले,’कोण संभाजीराजे?’

महाराष्ट्रातील ‘या’ शहराची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 94 टक्यांवर

यास चक्रीवादळाचं कव्हरेज करताना महिला पत्रकार ढसा ढसा रडली, पाहा व्हिडीओ

शिवसेना नगरसेवकाची दादागिरी; तरूणाला लोखंडी राॅडने मारहाण

मुलगी जवळ येताच गाढवानं केलं असं काही की ते पाहून तुम्हीही चकित व्हाल, पा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More