बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कधीकाळी होता कैदेत, आता होऊ शकतो अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष

काबुल |  अफगाणिस्तानचं भविष्य आता तालिबानच्या हातात आहे. 20 वर्ष युद्ध करून तालिबानने शेवटी अफगाणिस्तानवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. अमेरिका, इंग्लंड व अफगाण सैन्य यांच्या फौजांशी तालिबान 20 हुन अधिक वर्ष लढत होतं. अमेरिकन व इंग्लंड सैन्य मायदेशी परतताच तालिबानने काबुल काबिज केलं आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करताच नवे नेतृत्व कोण असेल याची चर्चा जगभर होत आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी तालिबानला सत्तेचं हस्तांतरण शांततेत करण्याचं आवाहन केलं आहे. अफगाणिस्तानमधील जनतेला एक स्थिर सरकार देऊ असं तालिबान म्हणत आहे.

तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादार हा अफगाणिस्तानचा नवा राष्ट्रपती होण्याचा अंदाज आहे. बरादार हा सध्या तालिबानच्या राजकीय विभागाचा प्रमुख आहे. तो तालिबानच्या शांती वार्ता विभागाचा प्रमुख सदस्य आहे. 1994 मध्ये ज्या चार लोकांनी अफगाणिस्तानात तालिबानची स्थापना केली त्यातील बरादार हा एक आहे.

मुल्ला बरादार याने 1980 मध्ये रशियाच्या विरोधात बंड पुकारले होते. 1992 साली जेंव्हा रशियन सेना माघारी गेल्या तेंव्हा अफगाणिस्तान मध्ये गृहयुद्ध पेटवण्यात याचा प्रमुख हात होता. बरादार याच्या नेतृत्वातच अफगाण सरकार 1996 मध्ये पाडण्यात आलं होतं. अफगाण सैन्य व नाटो यांच्या विरूद्ध बंड पुकारल्या प्रकरणी त्याला 2010 साली अटक करण्यात आली पण 2013 साली अफगाण सरकारने शांतीचर्चेदरम्यान बरादारची सुटका केली. मुल्ला बरादारला 2018 मध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख करण्यात आलं होतं.

पाहा अफगाणिस्तानातील धक्कादायक व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या 

राज्यात डेल्टा प्लसचा धुमाकूळ सुरु; आणखी इतक्या रुग्णांना संसर्ग

“राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे वेगळे”

#Video | माॅल्स पुन्हा सुरु, मात्र नागरिकांना पाळाव्या लागणा ‘या’ अटी

सैनिकांंना पाहताच गुलाबराव पाटलांच्या भावना जागृत, पाहा व्हिडीओ

“तुम्ही एक दोन विदेशी कंपन्या विकत घेतल्यामुळे देशहित कमी झालं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More