खेळ

महिला क्रिकेटमध्ये धोनी म्हणून प्रसिद्ध असणारी ‘या’ खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Loading...

इंग्लंड : महिला क्रिकेट विश्वातील ‘धोनी’ अशी ओळख असलेल्या इंग्लंडची यष्टीरक्षक आणि फलंदाज सारा टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसंच सारानेही स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

माझ्या संपूर्ण कारकिर्दीत माझ्या संघातील खेळाडू आणि ईसीबी यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. इंग्लंडच्या टीमसाठी इतक्या वर्षांपासून खेळणे हे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहेत. 2006 मध्ये क्रिकेटची सुरुवात, अ‌ॅशेस मालिकेवर विजय, लॉर्डसमध्ये विश्वविजेता होणे हे सर्व क्षण मला नेहमी लक्षात राहतील, असं ट्वीट सारानं केलं आहे.

Loading...

साराने इंग्लंडच्या महिला क्रिकेटमध्ये 13 वर्षे इतका वेळ घालवला आहे. सारा गेल्या काही वर्षांपासून मानसिक त्रासाला सामोरी जात आहे. या त्रासामुळे तिने अनेकदा क्रिकेटपासून लांब राहावे लागलं आहे. मात्र यानंतर तिने साराने क्रिकेटला रामराम ठोकल्याची चर्चा सुरु आहे. साराला महिला क्रिकेट विश्वातील ‘धोनी’ म्हणून ओळखले जाते.

साराने वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. साराने इंग्लंडकडून 10 कसोटी सामन्यात 300 धावा केल्यात. त्याशिवाय 126 वन डे सामन्यात 4056 धावा केल्या आहे. 90 टी-20 सामन्यात 2 हजार 177 धावा केल्या आहेत. तिने आतापर्यंत 51 खेळांडूंना स्टम्प आऊट केलं आहे. साराने तिच्या कारकीर्दीत विकेटकीपर म्हणून 232 विकेट्स घेतल्या आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या