बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Beta आणि Delta व्हेरिएंटवर ‘ही’ लस अधिक प्रभावी; अभ्यासकांनी केला उलगडा

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानं देश चिंताग्रस्त होता. त्यात डेल्टा व्हेरिएंट हा भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. तर बीटा व्हेरिएंट हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. मात्र यावर प्रभावी लस मिळाली आहे.

हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस ही भारतात सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक या 3 संस्थांनी एकत्रीत केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.

या 3 संस्थांनी केलेला अभ्यास अद्याप प्रकाशित करण्यात आला नाही. या अभ्यासासाठी कोरोनातून बरे झालेले 20 रुग्ण आणि दोन्ही डोस घेऊन 28 दिवस झालेले 17 लोकांचे नमुने घेण्यात आले होते. कोवॅक्सिनची ही लस या 2 व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी असल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणार आहे. हे 2 व्हेरिएंट सगळ्यात पहिले भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे.

दरम्यान, डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के जास्त वेगानं पसरत असल्याचं समोर आलं आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचं प्रमाण जास्त आहे.

थोडक्यात बातम्या –

‘आमचं घर’ काही दिवसांपासून संकटात आहे, प्राजक्ता माळीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

‘मुख्यमंत्री लायक असते तर…’; नवनीत राणांची जहरी टीका

अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खेडेकर यांचं निधन

संतापजनक! इन्स्टाग्राम स्टिकरमध्ये शिवशंकरांच्या हातात वाईनचा ग्लास, इन्स्टाग्रामविरूद्ध तक्रार दाखल

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More