बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! पुणे आणि डोंबिवली पाठोपाठ ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

मुंबई | कोरोना महामारीचा (Corona) धोका काहीअंशी कमी झाल्याचं वाटत असतानाच आता ओमिक्राॅन (Omicron) या व्हेरियंटनं सर्वांना काळजीत टाकलं आहे. ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) पहिल्यांदा ओमिक्राॅनचा रूग्ण आढळला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात ओमिक्राॅन पसरत चालला आहे.

राज्यात पहिल्यांदा कल्याण डोबिंवलीमध्ये रूग्ण आढळला होता. त्यानंतर पुणे शहरात एकाच कुटुंबातील तब्बल 6 सदस्यांना ओमिक्राॅनची लागण झाल्याचं उघड झालं होतं. अशातच आता मुंबईत दोन रूग्ण आढळलं आहेत. मुंबईच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात हे रूग्ण दाखल आहेत. राज्यात वाढत चाललेली रूग्ण संख्या पाहता सरकार निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या सर्वप्रकारच्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. विदेशातून राज्यात येणाऱ्या प्रत्येकाला आता मोठ्या वैद्यकिय चाचणीला सामोर जावं लागणार आहे. ओमिक्राॅनच्या वाढत्या प्रभावामुळं गरज पडली तर सरकार निर्बंध लावण्याचा विचार करेल, असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनचा धोका आणि त्याचे गुणधर्म समजून घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या आठ दिवसात सरकार निर्णय घेणार आहे. परिणामी सध्यातरी जास्तीत जास्त आरटीपीसीआर चाचण्या करण्यावर सरकार भर देत आहे.

थोडक्यात बातम्या 

“नाना पटोलेजी राजकारण ठेवा बाजूला, तुम्ही स्वत:ला OBC नेता समजता ना?”

“उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही, खरा वाघ पहायला अधिवेशनात येणार”

“निवडणूक आली की आमच्या विरोधकांच्या अंगात येतं”, अजित पवारांचा टोला

“विषय राजकारणाचा नाही तर अस्तित्वाचा आहे”, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

‘…तरच राज्यात Lockdownचा निर्णय होईल’; राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More