बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बड्या राजकीय हस्तींनी मला…”; लंडनला गेलेल्या अदर पुनावालांचा धक्कादायक खुलासा

मुंबई | कोविशिल्ड लशीसाठी आपल्याला देशातील काही बड्या व्यक्तींचे फोन येत आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उद्योगपतींचा समावेश असल्याचंसीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. द टाईम्स यूकेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

धमक्या म्हणणं फार साधी गोष्ट ठरेल. या लोकांना असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा खरोखर खूपच विचित्र आहे. खरं तर हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. प्रत्येकाला आपल्याला लस मिळावी असं वाटतं आहे. मात्र आपल्याआधी इतरांना लस का दिली जातेय हे त्यांना समजत नसल्याचं अडचण निर्माण होत असल्याचं अदर पुनावाला म्हणाले. मी जर सत्य बोललो तर माझं शीर कापलं जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सीरम इन्स्टिट्यूट आता देशाबाहेर लस निर्मितीचा प्लान्ट सुरू करण्याचंही नियोजन करत असल्याचं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. अदर पूनावाला हे सध्या कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये असून तिथेच त्यांची ही मुलाखत झाली. यावर पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भारताता सध्या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड या लसीचं सर्वाधिक लसीकरण झालं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावं, मग तुम्ही काय झोपा काढताय?- चंद्रकांत पाटील

पुण्यात फार्महाऊसवर नाचगाणं, पैशांचा पाऊस अन् पोरी, पोलिसांची रेड पडदाच गदारोळ

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही- नाना पटोले

“…तर भर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करेल”; गुलाबराव पाटलांचं महाजनांना आव्हान

विनाकारण घराबाहेर फिरत होत्या मुली, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More