बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलाला समोर बघताच वाघाने केला हल्ला अन्…; पाहा व्हिडीओ

लंडन | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात. काही व्हिडीओ खुपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ असे असतात, त्यांना पाहिल्यांवर आपल्या अंगावर काटाच येतो. सध्या सोशल मीडियावर अनेक पशु-पक्षांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

अनेकजण फिरायला निसर्गरम्य ठिकाणी बाहेर जातात. तर काहीजण खास प्राण्यांना पाहण्यासाठी जंगल सवारी करण्यासाठी जातात. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, आपल्या समोर एखादा पाळीव प्राणी आला तरी आपल्याला घाबरायला होत. परंतू सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक लहान मुलगा वाघासमोर तसाच उभा राहिलेला दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा थांबलेला असतो. त्याच्याच मागून एक वाघ येत असतो. त्या मुलाला तो वाघ बघतो आणि त्याच्याकडे धाव घेतो. आपल्याकडे वाघ येत असल्याचंं त्या मुलाला माहिती असूनही तो त्या ठिकाणाहून हालत नाही. तो त्याच जागी उभा राहतो. त्याच्या मागून तिथेच थांब असं कोणीतरी बोलल्याचा व्हिडीओमध्ये आवाजही येत आहे.

वाघ त्या मुलाच्या जवळ येतो आणि त्याच्यावर झडप घालतो. परंतू त्या मुलाला काहीही होत नाही. कारण मुलाच्या आणि त्या वाघाच्या मध्ये एक पारदर्शक काच असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हल्ला केल्यानंतर त्या वाघाचे तोंड त्या काचेवर जोरात आपटलं असल्याचही दिसून येत आहे. त्या मुलाने आणि त्या कुटुंबाने त्या वाघाची चांगलीच फिरकी घेतली असल्याचं दिसत आहे. त्यानंतर तो मुलगा आणि त्याच्यासोबतचे सगळे त्या वाघाकडे पाहून हसायला लागतात.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन घरातच पुरला मृतदेह, चिमुकलीला धमकी, पाहा व्हिडीओ

पुण्यातील गरवारे शाळेच्या मैदानावर केला मित्राचा खून अन्….

6 वर्षीय मुलीच्या ‘या’ व्हिडीओवर शिक्षण विभागाने घेतली दखल, बदलली ऑनलाईन क्लासची वेळ

फडणवीसांनंतर एकनाथ खडसे आणि उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना ऊधाण

काय सांगता ! घाटी रूग्णालयात ICU मधील ‘या’ उपकरणाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More