बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार?

नवी दिल्ली | केंद्र शासनाने 25 फेब्रुवारी 2021 ला भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल कंटेंटला रेग्युलेट करण्यासाठी तीन महिन्यांच्या आत कम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करायला सांगितली होती. या सगळ्यांनी भारतातून काम करणं अपेक्षित होतं. मात्र, अजूनही या कंपन्यांनी हे आदेश पाळलेले नाहीत. त्यामुळे या कंपन्यांच्या इंटरमीडियरी स्टेटला संपुष्टात आणलं जाऊ शकतं तर त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते.

केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, कू अॅप या समाज माध्यमांकडून भारतात नोडल ऑफिसर, रेसिडेंट ग्रीवांस ऑफिसरची नियुक्ती करण्यात यावी. या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला 15 दिवसांच्या आत ओटीटी कंटेंटविरोधात येणाऱ्या तक्रारींचं निवारण करावं लागणार आहे. याशिवाय सोशल मीडियाचे मासिक अहवाल काढत त्यामध्ये तक्रारी आणि त्यांच्या निवारण्यासाठीच्या मार्गांचाही उल्लेख करणं अपेक्षित आहे. कोणत्या पोस्ट समाज माध्यमांवरुन हटवण्यात आल्या, त्यामागची कारणं काय हेसुद्धा इथं नमुद असणं आवश्यक असणार आहे. सदर सोशल मीडियाकडे भारतातील फिजिकल अॅड्रेसचा उल्लेख, कंपनीच्या मोबाईल अॅप आणि संकेतस्थळावरही असलाच पाहिजे.

नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार 24 तासांच्या आत इंटरनेटवरुन आक्षेपार्ह माहिती हटवली जाणं बंधनकारक असेल. तर, एक अशी यंत्रणाही या कंपन्यांना स्थापन करावी लागणार आहे, जिथे या तक्रारींची नोंद केली जाणार असून, 15 दिवसांत त्यांचं निवारणही केलं जाईल. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचा आपण आदर करत असल्याचं सांगत त्या अंमलात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरु असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. तर, ट्विटरकडून यासाठी आणखी सहा महिन्यांचा वेळ मागण्यात आला आहे. भारतीय ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कू अॅपनं सरकारचे नियम अंमलात आणले आहेत.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातच केंद्र सरकारनं या समाज माध्यमांच्या कंपन्यांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल करत नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. यासाठी देण्यात आलेली वेळेची मर्यादा 25 मे रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळं आता केंद्र सरकार या समाजमाध्यमांवर आजपासूनच निर्बंध लावण्याची कारवाई होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“पीएम केअर फंडात 2.51 लाख दिले, पण माझ्याच आईला बेड मिळवून देऊ शकलो नाही”

बीएमसीने काढलेल्या ‘या’ ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण…

स्वत: गर्भवती असूनही 9 महिने केली रुग्णांची सेवा, प्रसुतीवेळी कोरोनाने नर्सचा मृत्यू आणि….

“असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली”

ठाकरे सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More