बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना रुग्णाला दारु दिल्यास तो बरा होता’; नगरच्या डाॅक्टरचा अजब दावा

अहमदनगर | संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना संसर्गावर अजूनही औषध तयार झालेलं नाही. कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे लसीकरणाचं काम सुरु आहे. कोरोनावरील उपचारांसाठी एकीकडे रेमडेसिवीर आणि इतर औषधांची कमतरता जाणवतं आहे. या परिस्थितीत कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावचे डॉ. अरुण भिसे यांनी अजब फंडा वापरला आहे. कोरोना बाधित रूग्णाला योग्य प्रमाणात दारू दिल्यास तो बरा होता, असा दावा डॉ. अरुण भिसे यांनी केला आहे.

डॉ. अरुण भिसे यांनी सांगितलं की, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर तीव्रतेनुसार टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावीत. ज्या दिवशी तुमच्या तोंडाची चव जाईल, जेवण कमी होईल त्या दिवसापासून ज्यामध्ये 40 टक्के पेक्षा जास्त अल्कोहोल आहे, असं कोणतही म्हणजेच देशी दारु, वोडका, ब्रँडी किंवा विस्की या पैकी कोणतीही एक दारू 30 मिली आणि 30 मिली पाणी पेशंटला जेवणाअगोदर पिण्यास द्यायचं आहे. पेशंट गरोदर आणि लिव्हर संबंधी आजार नसला पाहिजे. दारु आणि पाणी याचं मिश्रण डॉक्टरांच्या सल्ल्यानं द्यावं, असही डॉ. अरुण भिसे यांनी सांगितलं आहे.

रूग्णाला दारु देण्यामागचं कारणं सांगताना डाॅ. भिसे म्हणतात, कोरोना विषाणूचं वरचं आवरण लिपीडचं आहे. हे आवरण अल्कोहोलमध्ये विरगळत आणि विषाणू निष्क्रीय होतो. त्यामुळे आपण हाताला सॅनिटायझर वापरतो. दारु शरिरात गेल्यानंतर ती रक्तवाहिन्यांमध्ये जाते. तिथून ती 30 सेकंदात सर्व शरिरात पोहोचते. फुप्फुसात दारु पोहोचल्यानंतर दारुचा हवेशी संपर्क झाल्यानंतर, दारु हवेद्वारे बाहेर पडते. या प्रक्रियेदरम्यान ज्याठिकाणी विषाणू असेल त्याचं आवरण गळून पडल्यामुळे निष्क्रीय होतो. दारु ही आयुर्वेदात आसव प्रवर्गात येते. दारु ही भूक न लागण्यावर रामबाण समजली जाते. कोरोना काळात रुग्ण दाखल झाल्यावर मानसिक दबाव असतो. तो दबाव कमी करण्याचं काम दारु करत असते, असं डॉ. भिसे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, डॉ. भिसे यांनी आतापर्यंत 40 ते 50 जणांना दारु घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केल्याची माहिती भिसे यांनी दिली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि दारुचं योग्य प्रमाण घेण्यास सांगतिलं. त्याप्रमाणं 40 ते 50 पेशंट बरे झाले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण गंभीर होते, ते बरे झाले, आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही, असं भिसे यांनी सांगितलं आहे. डॉ. अरुण भिसे यांच्या दाव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे

थोडक्यात बातम्या

सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा- देवेंद्र फडणवीस

“पवार साहेब, दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले पण…”

हसतं-खेळतं घर कोरोनामुळे उद्ध्वस्त; एकाच दिवशी दोन्ही मुलांचा मृत्यू

“मराठा आरक्षणासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा”; ‘या’ माजी विधानसभा अध्यक्षांची मागणी

सोनिया गांधींनी पुन्हा एकदा दाखवला ‘या’ नेत्यावर विश्वास सोपवली महत्वाची जबाबदारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More