बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

मुंबई | मराठी बिग बाॅसमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे कीर्तनकार शिवलीला पाटील. शिवलीलाने काही दिवसांपूर्वी स्वतः बिग बाॅसचं घर सोडलं आहे. मात्र घरातून बाहेर आल्यानंतर तिला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. अशातच शिवलीलाचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत बोलताना एका मुलाखतीत मी बिगबॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली असल्याचं शिवलीलाने म्हटलं आहे.

मी बिगबॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली, बिग बाॅसच्या घरातील सगळे सदस्य सकाळी तुळशीची पूजा करायला शिकले. मात्र, ते टिव्हीवर दाखवलं जात नाही, असं शिवलीला पाटीलने म्हटलं आहे. शिवलीलाने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने बिग बाॅसमध्ये जाण्यामागे फक्त शहरी लोकांपर्यंत कीर्तन नेणं असल्याचं सांगितलं आहे. बिग बाॅसच्या घरात जाऊन देखील मी माझी वारकरी संस्कृती सोडली नाही. मी तिथं राहून वारकरी संस्कृतीचं दर्शन घडवलं, मी अभंग गायले, ज्ञानेश्वरी वाचली, असं शिवलीलाने म्हटलं आहे.

पैसा आणि प्रसिद्धीसाठी शिवलीला बिग बाॅसमध्ये गेली असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना मी तिथं फक्त लोकांना कीर्तन काय आहे हे समजवण्यासठी गेले होते, वारकरी सांप्रदाय, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले होते, वारकरी सांप्रदायाला पैसा प्रसिद्धीची गरज नाही, मलाही नाही, असं देखील यावेळी शिवलीलाने म्हटलं आहे.

दरम्यान, कीर्तनकार शिवलीला पाटीलने बिग बाॅस मराठीमध्ये सहभाग घेतल्यामुळे अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. तसेच वारकरी सांप्रदाय देखील तिच्यावर नाराज आहे. यामुळे शिवलीलाने वारकरी सांप्रदायाची माफी देखील मागितली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे..”; फडणवीसांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

वारकरी सांप्रदायाला पैसा प्रसिद्धीची गरज नाही- शिवलीला पाटील

महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची बातमी

72 तास अन्नत्याग आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली

महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरू आहे का?, आशिष शेलार संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More