मन सुन्न करणारी घटना; आजोबा-नातवाचा दुर्देवी अंत

पुणे | एक अत्यंत दुर्देवी घटना समोर आलीये. दोन मोटारसायकल्सची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये (Accident) आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला आहे.

गोकुळ झेंडे हे बुधवारी संध्याकाळी आपल्या नातवाला त्याची शाळा सुटल्यानंतर घरी घेऊ जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. 

रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीने आजोबांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत आजोबा आणि नातवाला गंभीर मार लागल्याने नातवाचा जागीच मृत्यू झाला. तर आजोबांना रुग्णालयात नेत असताना ते मरण पावले.

या घटनेनंतर दिवे परिसरातही शोककळा पसरली आहे. महामार्गाच्या परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

या घटनेनंतर स्थानिकांच्या संतापाचा भडका उडला. पोलिसांनी नागरिकांना शांत करत तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-