बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झोमॅटो प्रकरणात खऱ्या-खोटाचा ‘हा’ व्हीडिओ आता होतोय प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ

बंगळुरु | काही दिवसांपुर्वी इन्सटाग्रामवरच्या एका ब्यूटी माॅडेलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये तीने तीच्या नाकावर ड्रेसिंग केली होती आणि एका झोमॅटो डेलेव्हरी बाॅयने तीच्या नाकावर मारल्याचं तीने त्या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्या झोमॅटो डेलेव्हरी बाॅयने त्या घटनेचा संदर्भ देत त्याची बाजू मांडली.

झालेल्या घटनेच्या दोन्ही बाजू समोर आल्यानंतर त्या प्रकरणावरुन बरेच मीम्स, व्हिडीओज व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्या महिलेला दोषी मानून डिलीव्हरी बाॅयला न्याय मिळण्याची मागणी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे केली आहे. एवढचं नाही तर बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने सुद्धा डेलेव्हरी बाॅयच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे.

संपुर्ण प्रकरणावर कोण खर आणि कोण खोट याच्या शक्यता मांडताना एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘अक्षय सोडा बाॅटल ओपनर वाला’ या नावाने अकाऊंट असलेल्या इंस्टा अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. शेअर करताच हा व्हिडीओ 72 हजार पेक्षा लोकांनी पाहिला असून प्रचंड प्रमाणात पुढे पाठवण्यात येत आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये ही घटना वेगवेगळ्या व्हर्जन्समध्ये कशी घडली असेल तसेच कशी घडली असती असे अनेक सिन्स दाखवले आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स वर्षाव होत असून जास्त लोक डिलीव्हरी बाॅयच्या बाजूने बोलताना दिसत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

सोने इतक्या हजारांनी स्वस्त; जाणुन घ्या आजचा भाव!

महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी- चंद्रकांत पाटील

अंबानी स्फोटकं प्रकरणातील ‘ती’ कार मुंबई पोलिसांची; एनआयएच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर!

“सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”

“दैव जाणिले कुणी?” या उक्तीप्रमाणे ते चौघे मरणाच्या दारातून परतले, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More