बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ॲमिटी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन शिक्षणाचं बिगुल वाजलं

मुंबई | महाराष्ट्रातलं पहिलं खासगी विद्यापीठ असलेल्या ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई इथल्या अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. बुधवारी कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही के शर्मा यांनी नवीन विद्यार्थ्यांना ॲमिटी विद्यापीठात सुरु असलेल्या वेगवेगळ्या कोर्सेसची तोंडओळख करुन दिली. सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीनं यात भाग घेतला. कोरोना कालावधीत ॲमिटी युनिवर्सिटीत ऑनलाईन पध्दतीनं वर्ग घेतले जात आहेत. आता तर ॲमिटीनं ऑनलाईन विद्यापीठच सुरु केलं आहे. सध्या ॲमिटी मुंबई कॅम्पसमध्ये सुमारे 16 विभागात 3000 हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही. के. शर्मा यांच्यानुसार “आजच्या विद्यार्थांना देशात आणि जगात काय चाललं आहे हे नेमकं माहितेय. जीवनात पुढे काय करायचं हे ही त्यांनी पक्क केलेलं असतं. या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन कर्तव्यदक्ष नागरीक बनावं. यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षण देत आहोत.”

ॲमिटी युनिव्हर्सिटीत चॉईस बेसड् क्रेडीट सिस्टम आहे म्हणजे विद्यार्थ्याला आपला अभ्यासक्रम निवडण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आलाय. शिवाय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आणि दोन वर्षे परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची संधी देण्यात येते. परदेशात न्यूयॉर्क, कॅनडा, सॅनफ्रान्सिस्को,पॅरीस आदी 8 ठिकाणी ॲमिटीचे कॅम्पस आहेत. तिथं जाऊन हे विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध विषयांचं अद्ययावत शिक्षण घेऊ शकतात. इथं शैक्षणिक संशोधनावर जास्त भर देण्यात येत आहे.

2030 पर्यंत भारताला Knowledge Superpower अर्थात ज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता बनवण्याचं उद्दीष्ट ॲमिटी ग्रुपतर्फे ठेवण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ॲमिटी युनिवर्सिटी ही अग्रगन्य स्थानी आहे. महाराष्ट्रातली एक महत्त्वाची शिक्षण संस्था म्हणून नावारुपाला येत आहे. ॲमिटी ग्रुपचे भारतात 12 ठिकाणी विद्यापीठे असून 11 कॅम्पस आहेत. येत्या काळात देशभरात 35 विद्यापीठं आणि 100 कॅम्पस सुरु करण्याचं उद्दीष्ट आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

पावसाने मोडला 12 वर्षांचा रेकाॅर्ड! 24 तासात तब्बल ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

12 पैकी ‘या’ 4 नावांवर राज्यपालांना आक्षेप???; मुख्यमंत्री-राज्यपाल भेटीनंतर चर्चांना उधाण

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मराठवाड्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

रात्री घरात शिरला बिबट्या अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More