बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार फक्त दीड माणसं चालवताहेत, एक मोदी आणि अर्धे अमित शहा, बाकी संगीत खुर्ची”

मुंबई | आज मोदींच्या मंत्रीमंडळाचा नव्याने विस्तार होणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर विद्यमान मंत्रिमंडळातून पाच ते सहा मंत्र्यांना वगळून त्यांना पक्षाच्या कामात घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकावर सडकून टीका केली आहे.

यासंदर्भात सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी देशाची डळमळीत अर्थव्यवस्था, आकाशाला भिडणारी महागाई, अपमानित होत असलेल्या महिला, बेरोजगारीने लाचार तरुण, आक्रोश करणारे शेतकरी, सीमेवर संकट झेलणारे सैनिक, दहशतवादाचे काश्मीरमध्ये वाढते संकट आहे. या सगळ्याचे आणि आपल्या अभूतपूर्व अपयशाचे खापर फोडण्यासाठी मोदींचा मंत्रिमंडळ विस्तार करून केंद्र सरकार काही अजून डोकी सामिल करत आहेत, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

तसेच सत्य हेच आहे की, हे सरकार केवळ दीड माणसं चालवत आहेत. एक मोदी आणि अर्धे अमित शहा. बाकी केवळ संगीत खुर्ची, असं म्हणत सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकास्त्र देखील सोडलं आहे. पुढे ते म्हणाले की, या मंत्र्यांना नाहीतरी ट्रोलींग शिवाय अधिक काम असणार नाही. त्यामुळे एक खुर्ची आणि अर्ध्या स्टूलवर बसलेल्या मोदी व शाहांना आम्ही प्रश्न विचारत राहू.

त्याचप्रमाणे यांना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलायला, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरूध्द लढण्याचे नियोजन करण्यास सर्वपक्षीय बैठक बोलावयाला वेळ नाही. पण दलबदलू व सत्तेसाठी हपापलेल्यांसाठी मंत्रिमंडळ विस्ताराचा खेळ अशा संकटकाळी मांडायला वेळ आहे, हे स्पष्ट दिसून येते. हाच मोदी सरकारचा खरा चेहरा आहे. मोदी सरकारच्या सत्तेच्या खेळाशी जीवनमरणाचा संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाचे कोणतेही घेणं देणं नाही, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शेतकरी उध्वस्त होत आहेत, जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत घरी जाणार नाही”

आज तब्बल एवढे मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; केंद्रीय मंत्र्यांची संख्या जाणार 81 वर 

दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग; मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ‘या’ चार मंत्र्यांचा राजीनामा

‘दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो’; शरद पवारांकडून आठवणींना उजाळा

अंतराळात बनणार पार्क; ‘ही’ प्रसिद्ध व्यक्ती करणार प्रवास

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More