बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नदीची दोन टोके केव्हाच एकत्र येऊ शकत नाहीत”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मोदी आणि पवारांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली आहे. या भेटीमागे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीवर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, राजकारण हे विचारांवर आधारित असते. संघाचा राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी पार्टीचा राष्ट्रवाद यामध्ये जमिन आसमानचा फरक आहे. नदीची दोन टोके केव्हाच एकत्र येऊ शकत नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे अशक्य आहे.

तसेच आजच्या पवार आणि मोदींच्या बैठकीत सहकारी बँकांसंदर्भात जे कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत त्यावर चर्चा झाली. सहकार हा राज्याचा विषय आहे. घटनेत बदल करून याला स्वायत्ततेचा अधिकार दिला गेला. त्यामुळे या संदर्भात पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्रकही सादर केलं आहे, अशी माहिती देखील मलिक यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, पवारांनी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंत्री पीयूष गोयल यांनी पवारांची भेट घेतली. पवारांनी आज थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता येत्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात मोठे भूकंप पाहायला मिळतील, असं काही राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘…मग हालचाली तर निश्चितच वाढणार’; पवार-मोदी भेटीवर मुनगंटीवारांचं ट्वीट

“काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बाहेर काढणारे अण्णा हजारे मोदी सरकारच्या काळात गप्प का?”

अबब! ईडीने अनिल देशमुख यांची तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त

लोकशाहीची निंदा करणाऱ्या भाजपच्या गुंडांना शिक्षा व्हायलाच हवी – प्रियंका गांधी

आईचं काळीज! वाघाच्या जबड्यातून लेकीला सोडवण्यासाठी लढली अन् जिंकलीसुद्धा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More