बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुचाकीस्वाराने पोलिसाला फरफटत नेलं; सीसीटीव्ही फुटेज समोर, पाहा व्हिडीओ

पिंपरी चिंचवड | पुण्यात पोलिसांच्या मदतीने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई सुरु आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी केली जात असून नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीये.

संबंधित जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून त्याच्याकडे कागदपत्रे आणि लायसन्सची विचारणा केली असता. आरोपीने वाहतूक पोलिसाला धक्का देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पकडण्यासाठी मागे धावलेल्या पोलीसालाच आरोपीनं फरफटत नेलं आहे.

एका नाकाबंदी पॉईंटवर हिंजवडी वाहतूक विभागाचे हवालदार शंकर इंगळे ड्युटीवर होते. यावेळी संजय शेडगे नावाचा व्यक्ती समोरून आला. पोलीस हवालदार इंगळे यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे लायसन आणि इतर कागदपत्रांची विचारणा केली. यावेळी लायसन आणि कागदपत्रे दाखवण्याऐवजी आरोपी शेडगे यानं इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. इंगळे यांना धक्का देऊन दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; ‘या’ अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने केलं रिव्हर्स ड्रायव्हिंग, पाहा व्हिडीओ

कोरोनामुळे मराठी गझलकाराला 90 वर्षांच्या आईसोबत रस्त्यावर राहण्याची वेळ!

हृदयद्रावक! 10 वर्षांनी पहिलं मूल झालं, 6 महिन्यांतच चिमुकलीला कोरोनानं गाठलं अन्…

‘…हा तर अजित पवारांचा दांभिकपणा’; चंद्रकांत पाटील आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More