बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झोपेत असताना काळाचा घाला! झोपेतच नवरा-बायकोचा होरपळून दुर्दैवी मृृत्यु

जळगाव | जळगावमधील जामनेर तालुक्यात गारखेडामध्ये घराला आग लागून एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृृत्यु झाला आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. उत्तम श्रावण चौधरी आणि वैशाली उत्तम चौधरी असं आगीत मृत्यु झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे.

मध्यरात्री दोन वाजेच्यानंतर त्यांच्या घराला आग लागली. आगी लागली त्यावेळी चौधरी दाम्पत्य घरात झोपलेलं होतं. त्यामुळे घराला आग लागल्याने या आगीत होरपळून दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घराला आग लागली याची माहिती गावातही कोणाला मिळाली नव्हती. त्यामुळे लवकर कोणीही मदतीला जाऊ न शकल्याने त्यांचा घरातच मृत्यू झाला.

पहाटेच्या वेळी एक ट्रक तेथून चालला होता त्यावेळी त्याने गावातील लोकांना उठवून आगीबाबत माहिती दिली. त्यानंतर गावातील लोकांनी चौधरींच्या घराकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. घराचा दरवाजा उघडण्साठी गावकऱ्यांनी प्रयत्न केेले पण दरवाजा उघडू न शकल्याने दरवाजा तोडून सर्वांनी घरामध्ये प्रवेश केला. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. आगीमध्ये चौधरी दाम्पत्याचा मृत्यु झाला होता.

दरम्यान, आग लागण्याच नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. चौधरी यांना  एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या दोघांचाही विवाह झालेला आहे. आग लागली तेव्हा उत्तम श्रावण चौधरी आणि वैशाली उत्तम चौधरी हे दोघेच घरात होते.

थोडक्यात बातम्या- 

…तेव्हा आमचाही जीव तुटतच असेल ना!; डॅाक्टरच्या पत्नीचं काळजाला हात घालणारं पत्र

मालदीवमध्ये कोसळलेल्या रॉकेटबाबत वॉर्नरने सांगितला थरारक अनुभव, पाहा व्हिडीओ

पुण्यात मोलकरणीने तब्बल 40 लाख रूपयांच्या सोन्यावर मारला डल्ला, अशा प्रकारे पोलिसांनी पकडली चोरी

नवऱ्याने आपल्या दुसऱ्या पत्नीची तलवारीने गळा चिरून केली हत्या

पोलीस पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी डॉक्टर पत्नी सेवेवर; ‘मला थांबणं शक्य नाही…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More