बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पुढील 3 महिने अधिक महत्त्वाचे’; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा गंभीर इशारा

नवी दिल्ली | कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे नव्या कोरोना रूग्णांचा देखील आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. देशात केंद्र सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या असताना तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील महिने नागरीकांना सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

दिवसाला कोरोनाचे सरासरी 20 हजार रूग्ण आढळून येत आहे. गेल्या आठवड्यात यापैकी केरळमध्ये 56 टक्के रूग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर पुढील तीन महिन्यात विविध प्रकारचे सण येत असून याकाळात गर्दी होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात आपण अधिक सर्तक राहावं लागणार आहे. गर्दीची ठिकाणं किंवा अनावश्यक प्रवास टाळायला हवं. घरी राहून आभासी पद्धतीने दिवाळीचे सण साजरे करावेत. त्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करावी, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशाच्या कोरोनाच्या आजच्या आकडेवारीनूसार दिवसभरात 24 तासात 22 हजार 431 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात 3 कोटी 38 लाख 94 हजार 312 इतका कोरोनाबाधितांचा आकडा झाला आहे. तर सध्या 2 लाख 44 हजार 198 इतके सक्रिय रूग्ण आहेत.

दरम्यान, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसून नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर जर महत्वाचं काम असेल तरच नागरिकांनी बाहेर गेलं पाहिजे.

थोडक्यात बातम्या-

भावाला अटक झाल्यानंतर शाहरूख खानच्या मुलीने घेतला हा मोठा निर्णय!

‘…म्हणून आजच्या कारवाया करण्यात आल्या’; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

“शाहरूख खानसारखी लोकं इथं कमावतात आणि पाकिस्तानला मदत करतात”

राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील ‘या’ संघाच्या पराभवामुळे होणार मुंबई इंडिअन्सला फायदा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More